दैनंदिन व्यवहारामुळे दुरावलेली मातृभाषा, उत्तम साहित्य शोधण्यासाठी अपुरा पडणारा वेळ, आणि धकाधकीच्या जीवनात स्वतःला वाचता येत नाही म्हणून होणारी तगमग याचा पर्याय म्हणून दुरेघी या संकेतस्थळामुळे नक्कीच एक मनाची उभारी घेता येईल. आम्रपाली महाजन यांचे मराठी व तसेच इंग्रजी दोन्ही भाषेतील लिखाण नक्कीच दर्जेदार आहे व एक उदयो न्मुख लेखक स्वतः कायम त्यात नावीन्य व दर्जा याची भर घालतच असतो त्यामुळे दुरेघी वर पुन्हा पुन्हा येण्यासाठी नक्कीच तुम्हाला नवीन कारण मिळत राहील. जसा एखादा उत्तम सिनेमा काही वर्षांनी पाहिल्यावर त्याचा वेगळा अर्थ आपल्या वयाने उमजत जातो तसेच दुरेघी मधील सर्व साहित्य पुन्हा पुन्हा वाचले तरी प्रत्येक वेळी वेगळा आनंद देऊन जाईल याचा मला विश्वास वाटतो. या उपक्रमासाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा.