मी ‘दुरेघी’ चे सर्व प्रथम अभिनंदन करते. वाचनाची आवड कमी झालेल्या समाजाला अशा उपक्रमाची अत्यंत गरज आहे. लोकांच्या हाती पुस्तका ऐवजी मोबाइल असतो. अशावेळी ही वेबसाईट लोकांना निश्चितच आकर्षित करेल. लेखक व विषय वैविध्य असावे.
विशेषतः लहान मुलांना रमवणाऱ्या रंजनपर व माहितीपर गोष्टी असाव्यात. ज्या संस्कारही करतील व माहितीही देतील. मला खात्री आहे ही वेबसाईट खूप यश मिळवेल. वासंती मुळजकर व आम्रपाली महाजन ह्यांना खूप शुभेच्छा.