‘महाराष्ट्राचे महाभारत’ म्हणून ज्या कालखंडाचा इतिहासकार गौरव करतात तो हा कालखंड आहे. मराठयांच्या या स्वातंत्र्ययुद्धाचा (१६८१-१७०७) ज्वर टिपेला नेण्याचे काम या दोन महान सेनानींनी केले.👍🚩🙏🏼

‘मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत. त्यास मोगली लोकांनी म्हणजे की पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय?रात्री दिवसा कोणीकडून येतील,काय करतील ,असे केले.मोगलाई फौजेत आठही प्रहर भय बाळगीत.’ असे बखरकार मल्हार रामराव लिहितात.

धनाजी जाधव (१६५०-१७०८) यांचे वडीलादी देखील स्वराज्याची सेवा करीत होते.जिजाऊनी सिंदखेड वरून या जाधव मंडळींना स्वराज्यात आणले.

हा सेनानी मृदुभाषी,हाताखालच्या  लोकांना सांभाळून घेणारा, मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशीही शिष्टाचाराने वागणारा ,राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपले धोरण ठरवणारा मुत्सद्दी होता.

संताजी च्या हत्येनंतर धनाजी जाधवांनी स्वतः पुढाकार घेऊन राणोजीकडे(संताजी पुत्र)तडजोडीचे व स्नेहाचे बोलणे लावले होते.

धनाजी राजारामांच्या निधनानंतर ताराराणींच्या नेतृत्वाखाली मुघलांशी लढत होते.

धनाजी जाधव यांची कारकीर्द प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, म्हालोजी घोरपडे व संताजी घोरपडे या महान सेनापतींच्या नेतृत्वात बहरली व ते स्वतः १६९६ ते १७०८ पर्यंत मराठ्यांचे सेनापती होते.

ऑक्टोबर १६९९ ते जून १७०० पर्यंत गनिमी काव्याने मुगल सेनापती झुल्फिकारखानास धनाजीने जवळजवळ २००० कोसांच्यावर(६२४०किमी) पळविले होते.

कित्येक मुगल सरदारांना पाणी पाजले होते.

१७०३ साली स्वतः औरंगजेब ने धनाजी सोबत तहाच्या बोलणीसाठी मोर्चेबांधणी केली होती.

सन १७०५ मध्ये सुरतेसह भरुच पर्यंत सर्व गुजरात धनाजीने लुटला होता.

१७०८मध्ये बाळाजी विश्वनाथच्या(नंतर हा प्रथम पेशवा झाला)मध्यस्थीने ताराबाईंचा पक्ष सोडून शाहू च्या बाजूने उभे राहिले.
पण लवकरच पायाला झालेल्या दुखापतीमुळे पेठवडगाव मुक्कामी त्यांचा मृत्यू झाला.

नगर प्रशासनाने धनाजी जाधव समाधी स्मारक विकसित करून जनतेस खुले केले आहे,तरी जाणकारांनी भेट देऊन महान सेनानीस अभिवादन करावे👍🏼🙏🏼🚩💐😊

●गनिमी काव्याचा महान सेनानी:संताजी घोरपडे●

सेनापती संताजी घोरपडे(१६६०-१६९६)हे सेनापती म्हालोजी घोरपडे(जे छ.संभाजी संगमेश्वरी पकडले तेव्हा शहिद झाले)यांचे चिरंजीव.

प्रचंड पराक्रमी संताजीने आपल्या बहिर्जी व मालोजी या भावांसोबत  दस्तुरखुद्द औरंगजेबच्या तुळापूर छावणीवर हल्ला केला होता.
तो आपल्या मुलीच्या शामियान्यात असल्याने बचावला पण ही घटना मराठ्यांना खूप उभारी देऊन गेली होती.

हे खरे की शिवाजी महाराजांच्या काळात मराठे अनेक गनिमी लढाया खेळले,परंतु या गनिमी युद्धतंत्राचा खरा विकास केला तो संताजी घोरपडे यांनी.

त्याकाळी तापी ते कावेरी अश्या मराठ्यांच्या लष्करी हालचाली वाढल्या. या विस्तृत क्षेत्रात विद्युत वेगाने हालचाली करून मोठया मुगल सेनानींना त्याने धूळ चारली व खुद्द बादशहाला दहशत लावली.

संताजीपुढे मोगली फौजा हतवीर्य व असहाय बनत.

इतिहासकार खफिखान म्हणतो ,”ज्याला संताजी शी लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशीबी तीनपैकी एक परिणाम ठरलेला असे-
१)एक तर तो मारला जाई वा,
२)जखमी होऊन संताजी च्या कैदेत सापडे,किंवा
३)त्याचा पराजय होई व त्याचे सैन्य आणि बाजारबुणगे गारद होत.”

वानगीदाखल बोलायचे झाल्यास,बादशहाने कासीमखान,खानजादखान,सफाशीकतखान,इ.अनेक उमराव सरदारांची फौज संताजी चा पाडाव करण्यास धाडली.पण संताजीने चित्रदुर्गजवळ(कर्नाटक) दोड्डेरीच्या गढीच्या हा रणसंग्राम असा काही गाजवला की हे एक Best Guerilla War होऊ शकते.मुख्य सरदार कासीमखान ने आत्महत्या केली व सैन्य जिवाची याचना करू लागले.

अशा या महान सेनानीचा भ्याड खून स्वकीयनेच केला व त्याचा शेवट झाला,हे कसे ते पाहू.

१)संताजी चा राजराम महाराजांशी बिघाड-
असे बिघाड २-३ वेळा झाले होते. स्थिरबुद्धि राजाराम व रामचंद्रपंतांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.या बिघाडाचे कारण इतिहासास ज्ञात नाही.पण,बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन तडजोड करणे हे छ.राजारामाचे धोरण आणी स्पष्टवक्तेपणा व थेट भिडणे हे संताजी चे धोरण यामुळे हा बिघाड असावा असा अंदाज.

२)प्रसंगी वेल्लोर जवळ छ.राजाराम व धनाजी, संताजीवर चालून गेले.या लढाईत संताजीने मात करून त्यांस परत जिंजीला पाठवले होते.( पण नाराज  असूनही कधीही संताजी ने स्वराज्य विरोध केला नाही.)

३)संताजी-धनाजी बिघाड

४)संताजी हा शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेला म्हणजे राजकीय तत्वज्ञानाच्या मुशीत तयार झालेला सेनानी.त्यांची दण्डनीती त्याच्या ठिकाणी बानली होती.संताजी लष्करी शिस्तीचे भोक्ते होते.म्हणून राजाराम कालीन बदलत्या परिस्थितीत स्वतः बदलून घेणे अवघड गेले असावे.

५)संताजी च्या पतनास तोच जबाबदार. स्वाभिमान चा अतिरेक झाला की त्याचे गर्वात रूपांतर होते . छत्रपतीशी उद्दाम वर्तन संताजीस भोवले असणार.

६)या कालखंडात अनेक मराठे सरदार कल पाहून तळ्यात-मळ्यात करत.कधी मुगल तर कधी स्वराज्य. अशा लोकांचा संताजीस खूप राग.अशाच अमृतराव निंबाळकरास लढाईत पराभूत करून हत्ती च्या पायी दिले गेले.

७)गाजीउद्दीन खान मोगल सरदार,धनाजी जाधव व हंबीरराव निंबाळकर इ. हे सर्व संताजी च्या  मागावर होते.सातारच्या शम्भू महादेव डोंगरावर संताजीचा मुक्काम होता.वरील प्रकरणातील अमृतराव ची बहीण राधाबाई व तिचा नवरा म्हसवड चा देशमुख नागोजी माने यांनी सापळा रचला.

८)गाफील परिस्थितीत संताजी ओढ्यावर स्नानादी कर्म आटोपताना नागोजी माने याने त्यांचा खून केला(जुलै१६९६).
डोंगराच्या पायथ्याशी ‘कारखाळे’ गावाजवळ ही घटना घडली. नागोजी माने हा ‘मुगल-स्वराज्य’असे राजकारण करीत असे.खुनादरम्यान हा स्वराज्यात असून मुगलांशी पत्रव्यवहार करत होता.

शत्रूपक्षीयांच्या भल्या भल्या नामांकित सेनानींची हृदये कँपायमान करणाऱ्या मराठ्यांच्या या महान सेनानीचा शेवट असा दुःखांत व्हावा ,यापरी दुर्दैव कोणते?
संताजी सारखा प्रतिसंभाजी मराठयांना निर्माण करता आला नाही.!

कृष्णा – पंचगंगा संगमावर नृसिंहवाडीला पुढील पिढीने संताजी चे समाधी स्मारक नंतर विकसित केले.
🚩🚩💐💐🙏🏼🙏🏼
क्रमशः

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us