fbpx

चालताना तोल व्यवस्थित साांभाळता येऊ लागलेल्या माझ्या दोन-अडीच वर्षाच्या लेकीला घेऊन पायीच
बाहेर निघाले होते. तिच्या ‘आपाप’ चालण्याच्या अट्टाहासामुळां साहजिकच तिच्या आणि माझ्या चालण्याच्या
वेगात फरक पडत होता. त्यातच वाटेत दिसणाऱ्या नवनवीन गोष्टींकडे वळून पाहाण्यात तिला फारच मौज
वाटत होती. तीच कुतूहल, जिज्ञासा माझ्या गडबडीच्या वेळेला अगदी पूर्ण जागृत झालेली होती. त्यामुळ
तीच मागं वळून पाहात पुढं चालणं आणि माझं तिला माझ्या वेगानां चालण्यासाठी फराफरा ओढणं ह्या
कसरतीत तिनं धरणी मातेला साष्टांग नमस्कार घातला.
‘उंदीर पळाssssलाss’ असं म्हणत खरचटलया जागी फूं फूं करणं, तिची अस्ताव्यस्त पादत्राणं पुन्हा तिच्या
पायांत चढविणं, दोन सेकंद शाांत बसून पुन्हा आपण पडल्याचं आठवल्यावर तिनं मोठा गळा काढणं आणि
त्यावर मी रस्त्यात असल्याचां भान ठेवून डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवत अत्यंत गोड सुरात सोन्या-मोन्या,
बबड्या-छबड्या करत तीची समजूत घालणं इत्यादी सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा एकमेकींचा हात
धरून आमची वरात निघाली.
अनायसे मला भाषण ठोकण्याची सांधी चालून आली होती. त्यात तेव्हा लेक अगदीच बालपणात असल्यानं
‘हे, चिल मॉम’ वगैरे व्यत्ययाचाही प्रश्न नव्हता. त्यामुळे मी उत्साहात सुरू झाले. ‘मोठ्या माणसंच जरा
ऐकावां गां! किती वेळा सांगितलंय कि, नीट पुढं बघून चालावं, मागं बघत बघत पुढं चालायला लागलीस तर
चालता येणार नाही, बाळा! पुढं जाताना पुढं बघूनच चालायला हवं !’ अशी दोन-चार वाक्य टाकली आणि
माझी मीच विचारात पडले. माझ्या आई-बाबांनी मला हेच सांगितलं असेल, आता मी माझ्या लेकराला
साांगतेय आनि उद्या तीही तिच्या लेकरांना हेच…., ही अशी साखळी सुरूच राहील आनि घरोघरी अगदी हे
आणि असंच घडत असणार!
‘नीट पुढं बघून चाल’… म्हंटल तर साधेसे चार शब्द.पण आपण कधी त्यावर विचार केलाय!? खरंच
आयुष्यात हे आचरायला जमलं तर अक्षरश: निम्मी लढाई जिंकल्यातच जमा होईल! आपण तर भूतकाळाचे
संदर्भ घेतच भविष्याची वाट चालत राहातो आणि कदाचित आपलीच वाट खडतर करून ठेवतो.
भूतकाळातल्या अनुभूतीनं सोबत मनात जागलेला राग, द्वेष , मानापमान, मत्सर, सूड अशा भावना अगदी
असोशीनं जपून ठेवतो. त्याांना जोपासत मागे वळून पाहात राहाताना पुढं जाणं फारसं जमतच नाही. मनात
आलं कि, पुढं जायचं असेल तर मागचां मागांच सोडून, मागं वळूनही न पाहाता लक्षपूर्वक पुढचीच वाट
चालली पाहिजे मग किती सहजतेनं, उरात मोकळा श्वास भरून घेत, नव्यान जगण्याच्या सगळ्या मिती
आजमावत सुखाचा प्रवास घडेल! स्वच्छ समोरचा रस्ता आणि आपली सरळ चाल… सगळांच किती सोपं
होऊन जाईल !
जगणं सोपं करणाऱ्या, आनंदाच्या क्षणांनी सहजी ओंजळ भरू शकणाऱ्या अशा कितीतरी अर्थपूर्ण गोष्टींचं
बाळकडू आपल्या वडिलधाऱ्यांकडून आपल्याला मिळत असतंच. त्याकडं डोळसपणे पाहायला कुठेतरी
आपणच कमी पडतो. भूतकाळाकडं मान वळवून वळवून पाहात भविष्यातल्या सुंदर क्षणांना पाठमोरे
होतोच होतो, शिवाय वर्तमानातही ठेचकाळत राहातो. त्यापेक्षा मागचं मागं टाकून भविष्यातल्या बिलोरी
क्षणांचा कानोसा घेता आला तर!?

Contributor
 • >

  Login

  Welcome to Typer

  Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
  Join Typer

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments
  Need Help? Chat with us