सर्वांचा  उत्साहपूर्वक सहभाग व उत्कृष्ट नियोजन यामुळे आमचा विवाहसोहळा मोठ्या थाटात व यथासांग पार पडला. तद्नंतर ठरवून आमचा प्रवास (?) (बहुतांशी अभ्यास दौरा) सुरू झाला . यावेळी ठिकाण होते केरळ !!!

            केरळ निवडल्याचे कारण म्हणजे विषुववृत्ताच्या नजीक असल्याने बोचरी नसणारी थंडी. उत्तर भारतापेक्षा असलेल सुरक्षित वातावरण हे दुसरे कारण ! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदानी केरळचे वर्णन वेड्यांचा बाजार असे केले होते त्याच केरळने सद्यास्थित  ९३.८१ % साक्षरता दर मिळवला. भारतातील पहिली मस्जिद तसेच चर्च केरळमध्ये अस्तित्वात आले ८ व्या शतकात  हिंदू धर्माला उर्जितावस्था देण्याचे काम केलेले आदि शंकराचार्य  केरळेचेच सरतेशेवटी निसर्गाची मुक्त हस्त उधळण म्हणून देखील केरळ पाहण्याचे ठरविले.

            मनाची, शरीराची, सामानाची, ट्रॅव्हलींग एजेंटची आणि हो विमान तिकिटांचीसूद्धा पूर्ण तयारी झाली. आम्हाला विमानतळाजवळ पोहचवून मामा माघारी गेले. पण ते घरी पोहोचेपर्यंत आम्ही कोचीन ला दाखल झालो देखील त्याचीच हि सुरम्य कथा आता सुरु होतेय.

            माझा व अंजलीचा हा पहिलाच विमान प्रवास चोहीकडे पाहून अंदाज घेण्याचे माझे काम चालू होते तोच CISF चे पोलीस Main ‘In Gate’ वर दिसले. त्यांना ओळखपत्र व तिकीट दाखवून  व तद्नंतरची प्रोसीजर विचारून पुणे विमानतळाकडे चालते झालो. इथूनच तसा अभ्यास वैगेरे सुरु. तिला (अंजलीला) नेहमीप्रमाणे मी CISF व एकूणच पोलीस फोर्सबद्दल माहिती दिली. पण बऱ्याच अडीअडचणीनंतर फायनली आमची ठरलेली ट्रीप ती मनसोक्त अनुभवण्याच्या धुंदीत होती. Indigo च्या डेस्कवर सामानाचे वजन केले ते व्यवस्थित भरले (अधिक नव्हते !) त्यानंतर Security Check up आटोपल्यावर आम्हाला Waiting Lounge मध्ये थांबण्यास सांगितले गेले. तिथे एका सदगृहास्थाने आम्हाला इथून पुढची प्रोसिजर सांगितली व आम्ही विमानाच्या प्रतिक्षेत थांबलो. झाले प्रतीक्षा संपली आम्ही विमानाकडे कूच करीत होतो. अंजलीचा आनंद गगनात मावत नव्हता. भरपूर सारे सेल्फी पिक्स काढण्यात ती दंग आणि मी नेहमीप्रमाणे पुढची प्रोसिजर व सुरक्षा यामध्ये व्यस्त सरतेशेवटी ती खिडकीशेजारी व मी बाजूला असे बसलो मला धीर देण्याचे कामा तिच्याकडेच  होते कारण मला उंचीची व स्पीडची भीती वाटते. खूपच छान प्रवास होता तो भिरभिरत्या नजरा सगळ काही डोळ्यात साठवत  होत्या झोप लागत नव्हती मुळी पूर्णपणे निरीक्षण चालू होत. २.४५ am ला सुरु झालेलं आमचे विमान बरोबर ४.१५ am ला Cochin Internatnational Airport ला थांबले देखील. दोघेही खूप excited होतो विमानातून बाहेर आल्यानंतर लगचेच तेथील वातावरणातील दमटपणा व दर्प जाणवला. बाहेर पडताच ऐन तिशीतला पांढरा T-Shirt घातलेला गोरा, जफिद(Driver) आमच्यासाठी हजर होता. मला जे जे ज्ञान होत केरळ बद्दल ते सगळ मी पूर्ण प्रवासात जफिद्शी शेअर करत होतो. अवांतर वाचन मुद्दाम केलेला अभ्यास याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा घेत होतो. इतिहास व वर्तमानाबद्दल चर्चाकरत होतो . तो बिचारा मला छान दाद देत होता इतक्यात अजून पुरते उजाडलेले नव्हते तोच मला ‘कलाडी’ गावचा फलक दिसला. जफिदला विचारून खात्री केली आणिकाय तो माझा आनंद ते मला हव असणारे असे आद्य शंकराचार्यांचे जन्मभूमी गाव होते. अंजली पाठीमागे झोपली होती मंदिर वा जुनी वस्तू जे काही असेल ते मला पहायचे होत. एकेठिकाणी जफिदने गाडी थांबवली उजव्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे मोठी वस्तू लांबपर्यंत दिसत होती. तिला उठविले आणि आत गेलो तर ते आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन तशी स्थिती झाली कारण ती वस्तू ‘अद्वैत आश्रम’ होती पहिल्या प्रहरातील योग व ध्यान चालले होते. रामकृष्ण परमहंसांची शुभ्र मूर्ती  व बाजूला शारदामातातसेच विवेकानंद यांना मनोमन दंडवत घातला घातला व फोटो काढून आम्ही निघालो एव्हाना जफिद्ला ती चूक कळली त्याने आम्हाला जन्मभूमीकडे नेले. तेथे रीतसर दर्शन घेऊन अंजलीला तिथला इतिहास समजावत आम्ही गाडीकडे वळलो. जफिद व मी दोघेही गप्पामारत प्रवास करत होतो . मनात एक वेगळाच समाधान व कुतूहल होते.  वाटेत एकाठिकाणी सुंदर धबधबा पाहून आम्ही अनाचल ला पोहोचलो. हॉटेल IceBerg नवकोर होत. हॉटेलच्या सोपस्कारांनंतर खूपच छान रूम आम्हाला भेटली फ्रेश होऊन आम्ही नाष्टा केला व झोपी गेलो. गाढ झोपेनंतर दुपारी उठून आम्ही Lunch करून Backwater garden पाहण्यास गेलो. भारी वाटत होत सगळ. अंजली व मी सुद्धा खूप खुश होतो. भरपूर फोटो काढल्यानंतर तिथून आम्ही केरळ ज्यासाठी प्रसिद्ध आहे अश्या आयुर्वेदीक मसाज साठी आम्ही आमचे देह तेथील प्रशिक्षित थेरोपिस्टकडे सपुर्द केले भरपूर तेलाचा वापर व पद्धतीने शरीर जरा हलके वाटले. तिथून तसेच आम्ही ‘कलारीपयटू’ या केरळच्या पुरातन संस्कृतीक युद्ध कौशल्य पाहण्यास गेलो. खूप विररसाने ओतप्रोत असा तो कार्यक्रम होता. संध्याकाळ झाली. जाफिदने आम्हाला नजीकच्या Fog Resort मध्ये Dinner साठी नेले. येथेच्छ ताव मारला तिथे, मग शतपावली करत हॉटेलवर आलो. घरच्याना फोन केले. कालच्या प्रवासाने व दिवसभरच्या फिरण्याने झोप आली होती. जफिदशी बोलून दुसऱ्या दिवशीचा मुन्नार चा बेत आखला खूप साऱ्या अनुभवासाठी व आनंदासाठी आम्ही वाट पाहत होतो. तद्पूर्वी भरपूर खरेदीसुद्धा झाली होती. अंजलीने आई साठी सुती साडी खरेदी केली होती. पहिला दिवस खूप छान safe गेला.

            ठरलेल्या वेळेनुसार आम्ही आवरून नाश्त्यासाठी हजर झालो. माझे आवडते ब्रेड-जाम व उकडलेले अंडे असल्यामुळे मी खुश होतो, नाष्टयाचे पण Pics अंजलीने काढले हे सांगणे नको ! आमचा प्रवास सुरु झाला जफिद होताच  सारथ्य करायला मुन्नारच्या दिशेने गाडी भरधाव चालली होती अचानक हिरवा शालू परिधान केल्याप्रमाणे आजूबाजूला उंच लहान टेकड्या दिसू लागल्या पहिल्यादांच हो पहिल्यांदाच चहाचे मळे आम्ही प्रत्यक्षात पाहत होतो. आता मात्र फोटो घेण्याचा मोह मी पण टाळू शकत नव्हतो छान छान फोटोज काढले व मनातसुद्धा ते निसर्गसौंदर्य भरून घेतले. आमचा पुढे प्रवास सुरु होता एरवीकुलम राष्ट्रीय उद्यानाकडे ! जफिदशी चहा व मळयाबाबत  अजून माहिती घेत आम्ही उद्यानाच्या पायथ्याला येऊन पोहोचलो इथून मात्र आम्हाला सरकारी बसने वरती डोंगरावर जायचे होते. बऱ्याच वेळाने आमचा नंबर आला बसने जातानाच कळले कि एकतर लुप्त(endangered) होत असलेली व स्थानबध्द (endenic) असलेले Nilgiri Tahr  (wildgoat) पाहायला मिळणार  होती व अन्नामलाई  पर्वतरांगा सर्वोच्च शिखर म्हणजेच अनमुडी (२६८५ mtr) पाहायला मिळणार होते, त्याचबरोबर shola forest, Kuringi Flowers etc. मी तर जाम खुश होतो. कारण या सगळ्या गोष्ठी फक्त वाचल्या होत्या त्या आता अनुभवता येणार होत्या. भरपेट आस्वादानंतर आम्ही मतुपेट्टी डॅमकडे कूच केले. डॅममध्ये इतका interst नव्हता पण eco point च्या आशेने तिकडे गेलो. बऱ्याच वर्ष्यानंतर Childlife परत जगता आली ती म्हणजे छार्याच्या बंदुकीने फुगे फोडायला मिळाले. Instructor ने सांगितल्यानुसार बंदूक धरून नेम लावले व सगळे  Up to the point अंजलीने सुद्धा प्रयत्न केले. पुढे आम्ही eco point ला गेलो. तिथे जाताना elephant carridor पाहायला मिळाला. eco point ला खूप छान Pics काढता आले. मोठ्या केरळ मिरचीची Pics काढता आले. येता येता KDHPTea Factory मध्ये भेट दिली चहाच्या झाडाच्या पानापासून चहापुड  कशी  बनवली जाते तिथून ते चहा कसा करावा या पर्यंत डेमो तसेच खूप माहिती मिळाली. घरी न्यायला थोडी चहा पावडर सुद्धा विकत घेतली. तिथून संध्याकाळी परत हॉटेलकडे वळलो आज IceBerg Hotel लाच Dinner चा बेत ठरला. दुसऱ्या दिवाशीचा आम्हाला मुन्नारवरून निघून Thekkady ला जायचे होते. चहाचे मळे डोळ्यासमोरून जात नव्हते. तो अत्यंत लाजराबावरा निलीगिरी ताहर हि तसाच डोळ्यासमोर दिसत होता. प्रवासात सतत Smile देणारी Foreign स्त्री व हैद्राबाद ची आजी स्मरणात राहिल्या येता येता जीन्स टी शर्ट मधला लालू (हा आदल्या दिवशी पारंपारिक वेष्यात कलारीपयट्टू करत होता) आनंद देऊन गेला.

            Thekkady ला जायचा दिवस उजाडला भरपेट नाष्टा करून Iceberg Hotel च्या मॅनेजरला शुभेच्या देऊन आम्ही अनाचल सोडले. मी व जफीदगप्पा मारत निसर्गाचा आनंद घेत मार्गक्रमणा करीत होतो. पण हा उत्साह अर्ध्यावाटेपर्यंत टिकला. सततच्या टर्नमुळे उलटी आल्यासारखे होत होते. मुद्दाम एक ब्रेक घेतलाच Idukki Arch Dam जवळ गाडी थांबवली. जरा उतरून फ्रेश झालो नेहमीसारखे Pics काढले व Sprite प्राशन केले. आता जरा बरे वाटले. अजूनही बराच प्रवास होता तरीही जाताना आजूबाजूला पूर्ण

डोंगरावर Cardamom म्हणजे वेलदोडे बाग होती. मला तर typical मान्सून वनात आल्यासारखे वाटले School Atlas मध्ये वाचलेलं Cardamom Hills आठवल्या आज याची डोळा पाहत होतो पुढे गेल्यावर दुपारच्या वेळेस Thekkady जवळ Spice Garden पाहण्यास थांबलो. तिथे बरीचशी माहिती व थोडेफार मसाल्याचे पदार्थ घेऊन आम्ही बाहेर पडलो. Hotel Seasons ला पोहोचलो. थोडी रेस्ट घेऊन Elephant Ride साठी निघालो. जाताना नकोच वाटत होते पण अंजलीला सोबत करू म्हणून गेलो. थोडी वाट पाहून रांगेत थांबून आमचा नंबर आला.

माझ्या पोटात भीतीचा गोळा होता पण तरीही आजूबाजूला पाहून काय करू नये याचेच निरीक्षण करत होतो. ‘इंदिरा’ नावाच्या ह्त्तीनीवर आम्ही दोघे स्वर झालो काय तो अजस्त्र प्राणी तब्बल १२ – १५ फुट उंच ३ टन वजनाचा मस्तवान चालीचा ! अंजलीला उगीचच निट पकडायला सांगून मी मला धीर देत होतो. आजूबाजूला दाट व उंच झाडी मधेच येणारे ओढे त्यातून इंदिरा चालली होती मध्येच थांबवून माहुताने कॅमेरा मागितला व आमचे सुंदर फोटो काढले अंजली पूर्णपणे enjoy करत होती. तिची खूप वर्ष्यापासुनाची इच्छा पूर्ण होतो होती. तिच्या अशा अनेक इच्छा पूर्ण होवोत व त्याचे कारण मी असुदे हीच माझी इच्छा ! शेवटी अर्ध्या तासात फक्त २०० mtr अंतर कापून तो अजस्त्र प्राणी समेवर आला. नंतर भरपूर Chocolates वैगेरे घेऊन आम्ही कथकली नृत्य कार्यक्रम पहाण्यास गेलो. Indeed ! i was glad then , & exactly opposite for Anjali. मला हा प्रकार तसेच बारकावे जाणून घ्यायचे होते. पहिल्यांदा रांगेत जागा मिळाली मी नेहमीप्रमाणे नीट निरीक्षण केले शेवटी त्या कलाकाराबरोबर फोटो काढून आम्ही परतलो. वेळ झाला होता बाहेर कुठे न जाता Hotel Seasons ला Dinner केले छान होते. Aleppy ला जायचा आनंद उराशी बाळगून झोपी गेलो. छान झोप व मस्त नाष्टा करून आम्ही आलेप्पीकडे कूच केली. अलेप्पी म्हणजेच Allapuza असे लक्षात आले ब्रिटीश काळात ते एक महत्वाचे बंदर होते. मुळचा मल्याळी उच्चार अलपूडा (Allapuzha) ला ब्रिटिशांनी Alleppy केले होते. थेकड्डी , मधली  छोटी व कुबट रूम मुळे कधी एकदा ती जागा सोडतोय असे झाले होते . Allapuzha ला  निघायचं म्हणून खूप आनंद झाला होता. वाटेत जाता जाता दुतर्फा उंचच उंच वाढलेली रबराची झाडे निदर्शनास आली. तसा आमच्या हुशार जफीदने छान जागा पाहून गाडी थांबवली. खूप सुंदर फोटो काढले व रबराच्या बागेला मनाच्या कॅमेऱ्यातसुद्धा बंदिस्त केलं. पुढे जात असताना इतक कळाला होत की सबरीमला मंदिर याच भागात  कुठेतरी आहे रस्त्यावर काळी कफनी परिधान केलेले बरेच साधक  पायी जाताना दिसत होते . पण ११ ते ४५ वर्षे वयाच्या महिलांनाच तिथे प्रवेश नाही आहे. त्याच कारण म्हणजे ‘मासिक पाळी’ विलक्षण चीड आली असल्या मध्ययुगीन व कोत्या विचाराची मनात कधीच असल्या प्रवृत्तींना दुजोरा देणाऱ्या गोष्टीना भेट देण्याचे टाळणे हे ठरवलं जसे पुढे जात होतो तसे वातावरणातील बदल जाणवू लागले हवा थोडी दमट जाणवू लागली होती. हवेत एक वेगळाच दर्प जाणवू लागला होता.निसर्गाच आणखी एक विलक्षण रूप पाह्ण्यास आम्ही सज्ज होत होतो.      

            या दरम्यान एका ब्रीजजवळ जफीदने House बोटिंगचे ठिकाण दाखवले. मन हरकून गेले. तोच पुढे कयाल्स (Kayals) म्हणजेच समुद्राचे आत शिरलेले पाणी दिसू लागले. अंजलीचा आनंद गगनात मावत नव्हता. Hotel Pagoda येथे पोहचेपर्यंत वेळ झाला होता. रविवार असलेने सायंकाळी खूपच गर्दी होणार व तिथे असलेल्या शिकारा(नावेचा एक प्रकार जो जम्मू काश्मीर मध्ये वापरला जातो) बुकिंग होतील म्हणून आम्ही थेट शिकारा पर्यटन करायचे ठरवले. मोठी नाव व आम्ही दोघेच तसेच पुढे जाऊन एका बेटावर Lunch म्हणून आम्ही आनंदित होतो. खूप छान अनुभव होता शिकाराचा ! केरळच्या खूप प्रसिद्ध नेहरू चषक नौका नयन स्पर्धेचा शेवटचा बिंदू पाहायला मिळाला. पुढे शिकारा आमच्या नावाड्याच्या घरी सुद्धा थांबली. मग अस कळल कि आम्ही जसे प्रत्येक गोष्ठी साठी मोटारसायकल अथवा कार बाहेर काढतो तसे हे लोक नावेतून प्रवास करतात. मोठ्या नावा, होड्या आजू बाजूने जात होत्या.इतक्यात एका ठिकाणी आमची शिकारा थांबली व आम्ही उतरलो. खूपच छान !!! एक गरूड होते तिथे. मनात म्हंटले आकाशात खूप उंच जाणारा व खऱ्या अर्थाने पक्ष्यांचा अनभिषेक्त सम्राट असा इतक्या जवळ, खाली व शांतपणे विसावला कसा ? तोच नावाड्याने सांगितले कि तो तुम्हास काहीही इजा न पोहोचवता शांत राहील काळजी नसावी. मग काय, त्याच्या सोबत सेल्फी सुद्धा झाले अर्थातच भीत भीत ! नेहमी प्रमाणे समाधानाने जेवण व तेथील गोड्या पाण्यातील करीमीन जातीचा मासा फस्त केला. येताना शिकारा तून समुद्र-मानव–निसर्ग यांचे मनसोक्त झालेले मिलन पाहून कृथार्थ झालो. जफीद सोबत Hotel Pagoda येथे आलो. खूपच प्रशस्त व देखणे Hotel होते ते. चेक इन करून पाहिलं की स्विम्मिंग पूल पण आहे. मनातच ठरवले की उद्याची अंघोळ येतेच.

            कंटाळलेले शरीर तसेच बेडवर टाकले व पुरेश्या विश्रांती नंतर सायंकाळी आम्ही अल्पुडा बीच वर पोहोचलो. Selfies घेत घेत समुद्र किनारी पोहोचलो. दोघेही काही काळ स्तब्ध  झालो कारण तो अथांग समुद्र असतोच तसा. माझ्या आवडत्या सूर्याचे मीच दोन तीन सुंदर फोटो काढले. अंजलीच्या पाण्यात फिरण्याच्या हट्टाला मी साफ नकार दर्शवला पण तिने त्याला दुजोरा देत आमच्या नावाने वाळूवर अक्षरे काढली. खुप सुंदर, स्वच्छ व तितकाच गर्दी ने फुललेला समुद्र किनारा होता तो.  जसा च्या तसा डोळ्यात साठवला. पुढे येऊन पाणीपुरी खाल्ली खाताखाताच चौकशी अंती कळले की तो पाणीपुरी वाला मिसरुड फुटलेला मुलगा राजस्थानचा होता. त्या जमातीला मनोमन वंदन करून पाणीपुरी संपवली. उद्या आमचा निघायचं Plan होता.  छान झोप लागली सोमवारी उठलो तोच आन्हिक आवरून Swimming पुलकडे गेलो. मी बऱ्याच दिवसानंतर पोहणार होतो. पण अंजलीचा हा पहिलाच प्रयत्न होता. तिच्या भीतीचा पहिल्यांदा बिमोड केला. मी मनसोक्त डुंबलो. दोघांनीही खूप आनंद घेऊन नाष्ट्याला हजर राहिलो. मस्त केरळी पद्धतीचा नाष्टा करून तृप्त झालो.  आता कोचीकडे प्रयाण होत होते. वाटेत एक धोतर तसेच केळी व फणसाचे chips घेतले. कोची शहर पण तिथकेच विलोभनीय व रमणीय वाटले. Costal Road ने जात होतो, जणू आपल्या कोकणचा भास होत होता. पेरियार नदीला परत एकदा वंदन केले अन विमान तळाजवळ पोहोचलो. ततपूर्वी मस्त Lunch झाले होते. आम्ही दोघांनीही ठरविले की जफीदला भेट म्हणून आम्ही नेलेली शाल देऊ. खूप चांगला ड्रायव्हर आहे तो मला तर समविचारी व म्हणून मित्रासारखा भासला ! त्यानेही काहीही आढेवेढे न घेता पटकन गिफ्ट घेतले व नजरेआड झाला.

            आता मात्र थोडे सराईतपणे आम्ही दोघे हि Chochin Airport वर वावरत होतो. आमचे विमान Cochin वरून Bengluru मार्गे पुण्याला स्तीरावल. पुण्याच्या आसमंतात येताच धुक्याने स्वागत केले. खाली असलेल्या थंडीची चाहूल होती ती. संध्याकाळचे ६.३० वाजले होते. क्षणाचाही विलंब न करता त्या गर्दी मध्येही Olacab बुक केली. पदार्थांच्या प्रचंड किमती बघता स्वारगेटकडे जायचे ठरविले. प्रचंड ट्राफिक मधून स्वारगेट जवळ हॉटेल नटराज ला आलो. तिथेच डिनर करून ८.३० च्या सुमारास कोल्हापूर ला जाणाऱ्या एस.टी मध्ये बसलो. मध्य रात्री आम्हाला नेण्यास मामा आले होते व आम्ही सुरक्षित पणे घरी पोहोचलो.

            एकंदरीत पूर्ण प्रवासामध्ये थोडाही त्रास जाणवला नाही. ट्रीप खूपच छान झाली. तिकडे जातानाची परिस्थिती अशी होती की सगळाच रद्द होत कि काय ! पण आम्ही खूप साऱ्या अनुभवांना व नैसर्गिक सुंदरतेला मुकलो असतो एवढे मात्र नक्की. संपूर्ण कुटुंबासवे मुक्तपणे भेट द्यावी असे आहे केरळ ! इतके दिवस (इतक्या वेळा) वाचलेली बरीच प्रकरणे याची देही याची डोळा अनुभवता आली. मग ते अगदी पुण्यातील Airport वर भेटलेल्या CISF जवनापासून सुरु होऊन, विमान, कोची विमान तळावरील Solar Energy, कलाडी येतील आदि शंकराचार्य जन्मभूमी, मान्सून प्रदेशातील सदाहरित वने, केरळ आयुर्वेदिक मसाज, कलेरीपयाटू मार्शल आर्ट, चहाचे मळे, निलगिरी पर्वतरांगा, निलगिरीताहर, अनमुद्दी पर्वत शिखर, हत्ती सफारी, राष्ट्रीय उद्यान, कथकली नृत्य, कारडेमाम पर्वतरांगा, कॉफी – रबर बागा, सब्रीमाला मंदिर, कयाल्स, Handlum, पेरियार नदी व कोची शहर इथ पर्यंत.

            या सगळ्यात जफीद ची साथ होतीच. आमच्यात हेल्दी डिस्कशन होत असे. मग ते राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, बॉलीवूड ते अगदी त्याच्या गाडीबाबत पण असे. मी जे जे म्हणून माहिती होते तेते पडताळून पाहत त्याची शहानिशा करत होतो. जफीद इतकीच दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे अनिस. तो आमचा Trip Organiser होता. प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण खूप नम्रपणे त्यांनी सहकार्य केले.

            सगळ्यात महत्वाचे म्हणजे अंजली ! तिच्याच दाट इच्छाशक्ती मुळे हे सगळ पार पडल. संपूर्ण प्रवासाची बऱ्यापैकी आर्थिक बाजू तिनेच उचलून धरली होती फोटोग्राफीतलं तिचे कौशल्य वादातीत आहे. काहीही झाल तरी माग हटायचं नाही व सामोरे जायचं हे तिला जमत.  तिच्या सगळयानाही पण बऱ्याच Fantacy पूर्ण झाल्या. ती माझा Guiding Force होती. खूपचछान अनुभव होता. ही सुरवात आहे फक्त अजून खूप बाकी आहे….इथेच माझा हा लेखन प्रपंच थांबवतो!

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us