प्रत्येक नात्याचा साईडइफेक्ट
सहन करता करता
आपण होत जातो नातेग्रस्त
पोटचा गोळा
‘तू इंटरफेअर करूनको’ म्हणतो तेव्हा
ते नातंच अबोर्ट झाल्यासारखं वाटतं
बघत राहतो आपण सुन्नपणे
आपल्या आईपणाला नाकारणाऱ्या त्याला
कोणाच्या तरी भिंती आडून शब्द येतात
‘माझाच चुकलं तुझ्याशी लग्न केलं’
अशावेळी सप्तपदीची रीळ पूर्ण उलटी फिरते
एकाकीपणाशी येऊन थांबते
दूरवरून येणारे कापरे हतबल शब्द
‘अगं मला चक्करतंय’ आपण फोन हातात धरून हतबुद्ध
कि कर्तव्य
हे साईडइफेक्ट हळू हळू भिनत जातात रक्तात
सर्व हार्मोन्स हल्ला करतात मेंदूवर
आणि आपण पळू पाहतो
कुडीच्या तुरुंगाबाहेर
पण तुरुंगाला लावलं असतं
श्वासाचं मोठं कुलूप
आणि किल्ली असते
अनिश्चिततेच्या काळा हाती
आपण सर्व आरोप सहन करत
मरे पर्यंत जन्मठेप सहन करतो
— कारण आपण नातेग्रस्त असतो.

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us