आधूनिक भारतीय रंगभूमीवरील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे इब्राहिम अल्काझी. त्यांचे अलीकडेच निधन झाले त्यांच्याविषयी – आधुनिक नाट्यभिष्माचार्य : इब्राहिम अल्काझी

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने इब्राहिम अल्काझी यांचे ४ ऑगस्ट मंगळवारी दु:खद निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. अल्काझी यांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. परंतु गुरुवर्य कमलाकर सोनटक्के यांच्याकडून त्यांच्याविषयी खूप काही ऐकायला मिळे. ते त्यांचे शिष्य खरं तर पट्टशिष्. अल्काझींनी केलेल्या अनेक नाटकांचे अत्यंत अभ्यासपूर्ण नाट्यप्रयोग सोनटक्केंसह त्यांचे शिष्य असलेल्या अनेक जेष्ठ रंगकर्मींनी वेळोवेळी केले आहेत. त्यात आषाढ का एक दिन, अंधायुग, तुघलक, ज्युलियस – सिझर, रक्तकल्याण, इत्यादी नाट्यप्रयोग हे भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील मैलाचे दगड मानण्यात येतात. या नाटकांसोबतच अल्काझींचे व्यक्तिमत्व त्यांची गुणवैशिष्टये इत्यादींबाबत खूप काही ऐकायला मिळायचे.  विशेषतः त्यांची शिस्त, कडक-करारी स्वभाव अगदी पंतप्रधान नेहरू येणार असलेल्या नाट्यप्रयोगाला पंतप्रधानांना विलंब झाला तरी अल्काझींनी त्याची पर्वा न करता वेळेवर सुरु केलेला नाट्यप्रयोग, त्यांची मुलगी आणि शिष्या अमल अल्लाना हिला तिच्या कसल्याश्या चुकीबद्दल केलेली कठोर शिक्षा, कलावंतांनी चपळ आणि तंदुरुस्त असलंच पाहिजे, यासाठी विविध व्यायाम कसरती सराव याबाबतचा त्यांचा आग्रहीपणा,  नाटकाशी संबंधित कुठलेही काम कलावंतांनी आनमान न बाळगता नि:संकोचपणे केलेच पाहिजे हा त्यांचा असलेला दंडक, नाट्यगृहातील टॉयलेट्स स्वच्छ नव्हती म्हणून खुद्द अल्काझींनी हाती झाडू खराटा घेऊन केलेली साफसफाई, नाटकासाठीचे पोशाख व इतर साहित्य (प्रॉपर्टी) निवडण्यासाठी त्यांनी केलेला सखोल अभ्यास, भाषा शब्दोच्चारण त्यातील बारकावे कंप, चढउतार याबाबतचा त्यांचा काटेकोरपणा  अशा कितीतरी गोष्टी.   त्याविषयी बोलताना सोनटक्के सरांना किती सांगू आणि किती नको असे होऊन जाई .  तेच कशाला अल्काझींच्या सहवासात असलेल्या आणि आज भारतीय नाट्यचित्रपटांच्या दुनियेत मशहूर असलेल्या अनुपम खेर , नासिरुद्दीन शहा, उत्तरा बावकर, ओम पुरी, ज्योती सुभाष, विजयाबाई मेहता अशा कुणाजवळही अल्काझींचा विषय काढा, हि सगळी मंडळी भरभरून बोलतात. या असल्या गुणी शिष्यगणांचा असण्यासाठी खूप अभिमान आहे. तसाच तो रंगभूमीप्रेमी समर्पित भावनेने आपापल्या प्रदेशात काम करणाऱ्या रतन धिय्यम, तुषार रॉय (आसाम ), प्रेम कारंथ (कर्नाटक), बी जपानी, अशा अनेक नाट्यशिक्षकांबद्दल हि आहे हे खुद्द इब्राहिम अल्काझी आवर्जून सांगतात. माझ्या गुणी व परिणामी शिष्यगुणांमुळेच माझा मोठेपणा मिळतोय हेही ते विनम्रतेने  सांगतात. 

अल्काझी पंधरासोळा वर्षे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (NSD) डीसीचे संचालक होते. त्यापूर्वी ते मुंबईत बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप या नावाच्या संस्थेद्वारे निवडक पण प्रयोगशील नाटकं करीत होते. त्यांच्या या ग्रुपमध्ये रझा, हुसेन, अकबर व सुलतान पदमसी हमीद सयानी असे अनेक सृजनशील लोक होते.  त्याच्या आधी इब्राहिम अल्काझी लंडनच्या सुप्रसिद्ध रॉयल अकादमी ऑफ ड्रॅमेटिक आर्ट्स (RADA) या संस्थेत नाट्यशास्त्र शिकले होते त्यांचा या संस्थेतील प्रवेशाचा किस्साही भोण  वैशिष्ट्यपूर्ण आहे १९४७ साली आगबोटीने अल्काझी मुंबईहून लंडनला गेले.  पण ते तिथे पोचेतो ‘राडा’ ची प्रवेशप्रक्रिया, प्रवेशचाचण्या इत्यादी सगळे संपलेले होते. विलंबाबाबत दिलगिरी व्यक्त करून आपली राडात शिकायची इच्छा आहे, हे त्यांनी विनम्रतेने संस्था चालकांना सांगितलं.  त्यांची रंगभूमीप्रेमींची कळकळ शिकण्याची मनस्वी इच्छा , भारतात मुंबई – पुण्यात केलेलं रंगकार्य हे सगळं ‘ राडा ‘ च्या संचालकांनाही जाणवलं, आणि म्हणून अल्काझींना प्रवेश दिला. ‘राडा’ तील प्रशिक्षणाच्या सुमारे तीन वर्षात त्यांना जागतिक रंगभूमीचे ज्ञान मिळाले. एक नवी दृष्टी घेऊन ते मुंबईत परतले. त्या दरम्यान त्यांच्या परिवारातील बहुतेक सदस्य फाळणी झाल्याने पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. अल्काझी मात्र भारतातच राहिले.  त्यांचे वडील मूळचे सौदी अरेबियाचे तर आई कुवेतच्या.  वडिलांचा पुण्यात – मुंबईत व्यापारउदीम होता पुण्यातील वास्तव्यामुळे अल्काझींना , त्यांच्या आईला मराठी भाषा साहित्य नाटकं समजली. शिवाय सेंट विन्सेंट हायस्कुलातील शिक्षणामुळे फ्रेंच ,गुजराती या भाषा शिकायला मिळाल्या नाटकाची आवड त्यांना त्यांच्या या शालेयवयातच लागली. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजात घेतले.  तिथेही रंगभूमीशी संबंध अधिक दृढ झाला.

मेंटॉर : राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचा अभ्यासक्रम त्याच्या इमारतीचे होस्टेलचे रंगमंच व अन्य सुविधांचे डिझाईन हे सगळे अल्काझींनी केलेले आहे तिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून नाटक शिकायला तरुणतरुणी येत  अनेक तरुणतरुणींना तर त्यांच्या नाट्यवेडापाई त्यांच्या कुटुंबाने समाजाने अव्हेरलेले असायचे. तर अनेकांना दिल्लीचे वातावरण , इंग्रजी माध्यम हे झेपायचे नाही  म्हणून ते अस्वस्थ असायचे. सोनटक्केही तिथून पळून पानगावी परत येण्याच्या खटपटीत होते. पण अल्काझींनी दिलेला दिलासा जागवलेला आत्मविश्वास , आणि खऱ्या अर्थाने ‘ मेंटॉर ‘ म्हणून बजावलेली भूमिका यामुळे असे सगळे विद्यार्थी राष्ट्रीय नाट्यविद्यारूपाने रमले नंतर मोठेही झाले. म्हणजे अल्काझी केवळ नाट्यशास्त्र शिकवणारे शिक्षक नव्हते, ते खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांचे ( त्यांच्या भाषेत चिल्ड्रेन ) पालकही होते. तेव्हा दिल्लीच्या वर्तुळात प्रहसनात्मक आणि उथळ विनोदी नाटकं करणारे काही ग्रुप्स होते. त्या सर्वांसमोर जेव्हा अल्काझींनी ‘आषाढ का एक दिन’ चा नाट्यप्रयोग केला तेव्हा नाटक असंही असणं त्यालाही बुद्धीची, चिंतनाची जोड लागते , प्रत्येक पैलूवर बारकाईनं काम करावं लागतं हे प्रेक्षकांना उमजलं।  प्रेक्षक घडविणं, त्यांची अस्मितेचे उंचावणं हेही नाट्यकर्मींचीच जबाबदारी आहे, असे अल्काझी मानीत. म्हणून त्यांनी रंगभूमीवर सतत नवनवे प्रयोग केले.

बंदिस्त मंचाबाहेरचे नाटक : नाटकासाठी बंदिस्त रंगमंच (प्रोसेनियम थियेटर) हवा, ही रूढ कल्पना झुगारून त्यांना ‘अंधायुग’ (स्व. धर्मवीर भारती ) चा  प्रयोग फिरोजशहा कोटला मैदानावर केला (याच प्रयोगाला नेहरू उशिराने आले होते वगैरे) तर ‘तुघलक ‘ (स्व.  गिरीश कर्नाड) चा प्रयोग पुराना किल्लाच्या भग्न अवशेषांच्या पार्श्वभूमीवर केला आणि सारे दिल्लीकरच नव्हे , तर देशभरातील रंगकर्मी, रंगाभ्यासाक प्रभावित झाले त्यांच्या नाट्यप्रयोगांना दिल्लीतील विविध देशाच्या दूतावासातील (एम्बसीज ) राजदूत व वरिष्ठ गणही येत.  त्यांनी या नाटकाचे फोटो त्यांच्या त्यांच्या देशात पाठविले आणि इब्राहिम अल्काझी यांचे नाव जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले. एकार्थाने भारतीय रंगभूमीचे पुनर्रुज्जीवन करणे, तिच्या कक्षा रुंदावणे, असून ‘नॅशनल’ करणे, आशयविषय , सादरीकरण, शैली यांचे विभिन्न प्रयोग करणे यात अल्काझींचा सिंहाचा वाटा आहे. ‘काबुरी’ हा जपानी नाट्यप्रकार शिकविण्यासाठी त्यांनी जपानी तज्ञ रंगकर्मी आमंत्रित केले. तर फ्रेंच राज्यक्रांतीवरच्या नाटकासाठी फ्रान्स मधून इतिहासतज्ञ, रंगभूमीतज्ञ  बोलावले. केवळ प्रायोगिक नाट्यप्रयोग करण्यात त्यांनी आपली ऊर्जा खर्ची घातली नाही, तर त्या नाटकांच्या संहिता साहित्य, सेट्स, कपडेपट, आणि फोटोग्राफ्स, व्हिडीओज, त्यावरची समीक्षा, लेख इत्यादींचे एक आम ‘डॉक्युमेंटेशन’ शिस्त ही त्यांनी एनएसडीस घालून दिली. त्यामुळेच निघाले ग्रंथालय , संग्रहालय एक समृद्ध वारसा बनलेले आहे.

इब्राहिम अल्काझींना त्यांच्या आयुष्यात मानसन्मानही पुष्कळ मिळाले. दोन वेळा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, रूपवेदचा तन्वीर पुरस्कार १९६६ साली ‘पद्मश्री’,  नंतर १९७१ साली ‘पद्मभूषण’ आणि २०१० साली ‘पद्मविभूषण’ हे त्यातले काही ठळक पुरस्कार आहेत.  आज नाट्यशात्र शिकविणारे अनेक अभ्यासक अनेक विद्यापीठातून शैक्षणिक संस्थातून चालविले जातात.  त्या सर्वांचा आपल्या देशातील पाया कुणी घातला असेल, तर तो इब्राहिम अल्काझींनी घातला आहे. या विषयी दुमत नसावे. एक झपाटलेपणातून समर्पित कृतीने त्यांनी स्वतःला रंगभूमी चळवळीसाठी वाहून घेतले होते. आधुनिक भारतीय रंगभूमीच्या या भीष्माचार्यास श्रद्धांजली!

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us