fbpx

राज्यनाट्यस्पर्धेची अंतिम फेरी अलीकडेच औरंगाबादेत पार पडली.
त्यात एकूण ४६ नाट्यप्रयोग सादर झाले.
दररोज दोन नाट्यप्रयोग याप्रमाणे सुमारे एक महिनाभर हा नाट्यप्रयोग संपन्न झाला.
त्यामध्ये ज्या तीन नाटकांनी बक्षिसे मिळविली, त्याविषयी थोडक्यात पाळशेतची विहीर: रुद्रेश्वर पणजी या संस्थेचे हे नाटक आद्य महिला नाटककार स्व. हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी हि नाट्यकृती आहे तिला सर्व प्रथम येण्याचा मान मिळाला.
या खेरिज या नाटकाने पटकाविलेले असे: दिग्दर्शन: सर्व प्रथम: दीपक अमोणकर, नेपथ्य सर्व प्रथम: योगेश कापडी, प्रकाश योजना सर्व प्रथम : सतीश नार्वेकर, रंगभुषा सर्व प्रथम एकनाथ नाईक, संगीत दिग्दर्शन सर्वप्रथम नितेश नाईक याखेरीज उत्कृष्ठ अभिनय स्त्री सिद्धी उपाध्ये, अशी चांगली बक्षिसे पालशेतची विहीर या नाटकाने पटकाविली, दहाबारा नाट्यकलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या कामगिरीतून हिराबाईंच्या काळातील जो माहोल तयार केला गेला, तो खरोखरच लाजवाब होता. मुख्य म्हणजे सर्व कलावंत-तंत्रज्ञ यांची संपूर्ण नवे न्यांच्या आईच्या नावासह देण्याचा एक स्तुत्य पायंडाही या नाटकाने पाडला.
पूर्णविराम: लोकरंगभूमी सांगली या संस्थेने सादर केलेल्या पूर्णविराम या नाटकास दुसरा पुरस्कार मिळाला. त्यांनी मिळवलेले अन्य पुरस्कार असे: दिग्दर्शन सर्व तृतीय प्रताप सोनाळे, उत्कृष्ट अभिनय स्त्री व पुरुष रौप्प्य इरफान मुजावर, धनश्री गाडगीळ, अलीकडेच सोलापूर येथे संपन्न झालेल्या कामगार कल्याण नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ही पूर्णविरामने अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या चित्रकार मनोहर, त्याची बायको आणि त्याची प्रेयसी असा वरकरणी प्रेमाचा त्रिकोण वाटावा अशी ही कथा आहे. आता निर्णय घ्यायचा आहे तो मनोहरच्या व्हेंटिलेटर काढायचे का? केव्हा? याचा अशा परिस्थितीत या दोन स्त्रिया कसे वागतात, त्यांचे मानसिकता काय असते, त्यांच्यातील ताणतणाव, या प्रसंगामुळे त्यांना झालेला बोध अशी सगळी गुंतागुंत लेखक इरफान मुजावर यांनी या नाटकात मांडली. तिला सर्वच संबंधित कलावंतांनी आपल्या परिपक्व कामगिरीने फार सुरेखपणे, हृदयपणे मंचावर अभिव्यथा करून रसिकांची मने जिंकली.
मॉर्फोसिस: सर्व तृतीय क्रमांक मिळविला तो नाट्यभरती इंदूर या संस्थेच्या मॉर्फोसिस या नाटकाने. त्यांचे अन्य पुरस्कार असे आहेत दिग्दर्शन सर्वद्वितीयश्रीराम जोग, नेपथ्य सर्व तृतीय अनिरुद्ध किरकिरे, अभिनय रौप्य पदक श्रीराम जोग, अभिनय प्रमाणपत्र श्रुतिका जोग, रंगमंचावर एखादी भूमिका कशी जीवनात करायची याचे नाट्यशास्त्रीय प्रशिक्षण देऊन त्या नटामध्ये बदल घडवून आणायचा म्हणजे मॉर्फोसिस पण या प्रशिक्षण प्रक्रियेत नातं आणि त्याची भूमिका यांच्यातच जर द्वंद्व निर्माण झाले आणि त्या नाताळ हॉस्पिटलात भरती करायची वेळ आली तर त्यानं दोष कुणाचा? मातीस ओले करून केला आकार देणाऱ्या कुंभाराचा, त्या प्रशिक्षण पद्धतीचा कि त्या मातीच्याच गुणवत्तेचा?असे प्रश्न रसिकांच्या मनात उभे करणारे हे मूळ नाटक हिंदी भाषेत आहे ते इंदूरकर मंडळींनी बहरदारपणे मराठीत सादर केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भालचंद्र पानसे सुरेश गायश्वनी, अरुण मेहता, संजय पेंडसे आणि श्रीमती विजया शिरोळे यांनी काम पाहिजे. प्रस्तुत स्पर्धेतील अन्य काही महत्वपूर्ण नाटकांविषयीचे रसग्रहण सारांश रूपात पुढील अंकात.

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us